Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा

जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी जेटीचे काम रखडले : पुरातत्व खात्याची NOC मिळेना *पर्यटकांची कसरत थांबणार कधी?पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे कोर्लई,ता.२१ (राजीव नेवासेकर)जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखों पर्यटक मुरूडला येत असतात. पण हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना गेले कित्येक वर्षे कसरतच करावी लागत आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी किल्ल्याच्या मागील बाजूस ब्रेक वाॅटर जेटी तयार करण्याचे काम सुरू केले परंतु पुरातत्व विभागातर्फे NOC न मिळाल्याने जेटीचे काम रखडले आहे. यामुळे पर्यटकांची कसरत थांबणार कधी? असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी येथील जेटीवरुन शिडाच्या बोटीतून प्रवास करावा लागतो. या बोटींची शमता ३० ते ३५ प्रवाशांची असताना सुमारे ५० त्यापेक्षा जास्त प्रवाशी भरून नेत आहेत. या बोटीत कधीच पुरेसे लाईफ जॅकेट नसतात. अर्ध्यावर गेल्यावर बोटीच पर्यटकांची लुटालुट सुरू आहे. अधिकृत गाईड नसताना गाईड असल्याचे सांगून वारेमाप पैसे उकळले जातात. त्यामुळे पर्यटक कमालीचे संतप्त झाले आहेत. या ठिकाणी पर्यटकांसाठी लाॅंच सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक लाॅंचला त्यांच्या क्षमतेनुसार प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. काहीना ५० ते ५५ प्रवाशी क्षमता तर काहींना कमी काहींना अधिक परवानगी देण्यात आली आहे. किल्यात गेल्यानंतर आत स्वच्छता गृह बंद अवस्थेत असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे महिला वर्गाला यांचा मोठा त्रास होतो आहे.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत