कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर)अलिबाग तालुक्यातील रेवदंड्यापर्यंतचा भाग एम एम आर डी मध्ये समाविष्ट करण्यात आला असून आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत मुरुड जंजिरा तालुक्याचाही समावेश त्यात लवकरच करण्यात येणार आहे त्यांची घोषणा येत्या पंधरा दिवसांतच केली जाईल.अशी माहिती अलिबाग मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी नांदगावमध्ये बोलतांना दिली.
नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुअज्जम हसवारे यांनी येथील माळी समाज सभागृह आयोजित केलेल्या मुरुड तालुका अल्पसंख्याक समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते.लोकसभा निवडणुकीच्या काळात अल्पसंख्याक समाज महायुती पासून दूर जात असल्याचे लक्षात येताच निवडणुकीच्या विजया नंतर अल्पसंख्याक समाजाचा एक मेळावा आयोजित करुन त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खा. तटकरेंच्या विजयात अलिबाग मुरुड मतदार संघाचा मोठा वाटा आहे.मुरुड तालुक्यात अनेक विकासकामे केली आहेत त्यांचा बॅकलॉग भरून काढला आहे.मुरुडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही नियोजन केले आहे त्यामुळे राज्यासह केंद्राच्या अनेक योजना खा.तटकरेंच्या माध्यमातून राबविणार असल्याचे ते पुढे म्हणाले.बॅ.अंतुले साहेब आपल्याला गुरूस्थानी असल्याने त्यांची स्वप्ने आपण पूर्ण करणार आहोत.असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अल्पसंख्याक समाज बांधवांनी आपल्या समस्या, प्रश्न, तक्रारी मांडाव्यात आमदार त्या थेट सोडविणार असल्याचे मुअज्जम हसवारे यांनी सांगितले.त्यांनी आमदारांचे स्वागतही केले.मेळाव्यात सईद पंचुलकर, युसुफ अर्जबेगी,असगर दळवी,दिलावर महाडकर,जुबेर कुटकी,कुतुबुद्दिन उलडे ,विजय पाटील, प्यारा किल्लेदार,रिहान कादिरी,बादल कबले,मन्सूर अधिकारी,पंचूलकर आदींनी विविध प्रकारचे प्रश्न मांडून ते सोडविण्याचे आवाहन केले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, तालुका प्रमुख रुषिकांत डोंगरीकर,अनंत गोंधळी,भाई सुर्वे,अशोक धुमाळ,भगिरथ पाटील ,स्नेहा पाटील, निलेश घाटवळ , विद्याधर चोरघे, सुनील पाटील, असगर दळवी, मनोहर पाटील, जितेंद्र दिवेकर, दिलावर महाडकर, निसार दखनी, निसार अनवारे,जमीर बकवाल, महंमद सईद शिरसिकर,फैरोज अनवारे,नजीर मगनाखे, विशाल पाटील, योगेश जायसवाल, महेश पाटील, सय्यदअली खान,नुरजहा राऊत,दिनत हसवारे,साकिब गजगे, समीर दवनाक, आसिफ मदगरी,सकीना बोरी यांसह तालुक्यातील अल्पसंख्याक समाजांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुस्लिम बांधव उपस्थित होते.सुभाष टेंबे यांनी सुत्र संचालन केले तर सुहेल अनवारे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या