कोर्लई,ता.२(राजीव नेवासेकर)ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून देशात साजरा केला जातो. हा सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना स्तनपनाचे फायदे आणि आवश्यकते बद्दल जागरूक करणे हा असून त्याचाच भाग मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह निमित्ताने वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा चोले यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
जागतिक स्तनपान सप्ताह वेगवेगळ्या थीम अंतर्गत साजरा केला जातो यावर्षी या सप्ताहाची थीम *Closing the gap: Breastfeeding support for all* असे आहे.याचा अर्थ सर्व स्तरावरील मातांसाठी स्तनपान सुलभ करणे हा यावर्षीचा उद्देश आहे.बाळंतपणानंतर शक्य तेवढे लवकर स्तनपान सुरू केले पाहिजे.पहिल्या ६ महिन्यापर्यंत अमृतासमान आईच्या दुधाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही अन्न व पाणी देऊ नये बाळाची भूक भागेल इतकं दूध मातांना निसर्गाता निर्माण करता येते.
*स्तनपानाचे फायदे :- बाळासाठी*
•मातेच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी व विकासासाठी सगळे घटक असतात. (स्तनपान बाळाचे पहिले लसीकरण आहे)
•बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून जंतसंसर्ग जुलाब,सर्दी,एलर्जी, अतिसार,श्वसन संस्थेसंबंधीचे आजार अशा रोगांपासून संरक्षण मिळते.
•मेंदूचा उत्तम विकास होतो.
•बाळंतपणानंतर पहिले दोन ते चार दिवस पिवळसर रंगाचे चीक अत्यंत लाभदायक असते.व्यात अँटिबॉडी, प्रोटीन्स,विटामिन्स,मिनरल्स असे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक घटक बाळाला मिळतात.
•लठ्ठपणा,मधुमेह,हृदयरोग,उच्च रक्तदाब कोणाची शक्यता भविष्यात कमी होते.
*स्तनपानाचे फायदे :- आईसाठी*
•गर्भाशय आणि मातेचे शरीर पूर्वस्थितीत येण्यास मदत होते.
•प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव कमी होतो.
•स्तन गर्भाशय अंडाशय या अवयवांचे कर्करोग होण्याची शक्यता भविष्यात कमी होते.
आई आणि बाळाचे नातं घट्ट होते.
•आईने संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
•स्तनपान हे आई व बाळ दोघांसाठी उपयुक्त आहे त्यामुळे स्तनपान विषयी गैरसमज दूर करून स्तनपानाला कौटुंबिक सामाजिक स्तरावर प्रोत्साहन दिले पाहिजे.अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा चोले यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या