कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर)मुरुड जंजिरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सचिव विजय पैर आणि सुप्रसिद्ध साहित्यिक सिनेनाट्य कलावंत अभय पैर यांच्या मातोश्री श्रीमती रंजना जनार्दन पैर यांचे बुधवार दि.२४ जुलै २०२४रोजीसकाळी १०-२५ वा. वयाच्या ८४ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.
सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून मुरुड मध्ये परिचित असलेल्या रंजना पैर गोरगरिबांच्या हाकेला ओ देणा-या अडल्यानडल्यांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणा-या अशी त्यांची खासियत होती. त्यांच्या निधनाने मुरुड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या अंत्यविधीला जिल्ह्यातून, तालुक्यातून मान्यवर तसेच आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पती जनार्दन पैर गुरुजी, दोन मुले, एक मुलगी, दोन सुना, तीन नातवंडे आणि अनेक ऋणानुबंधनाने जोडलेली मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि.२ ऑगस्ट रोजी मुरुड विश्राम बाग येथे तर उत्तरकार्य शनिवार दि.३ ऑगस्ट २०२४ रोजी भंडार वाडा येथे राहात्या घरी करण्यात येणार असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या