खारेपाट,ता.२६(महेंद्र म्हात्रे) अलिबाग येथील कॉंग्रेसभवन मध्ये झालेल्या जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत उरण येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक शंकर पाटील यांची रायगड जिल्हा झोपडपट्टी जीर्ण चाळी संगोपन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
काँग्रेस भवन येथे रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत दीपक शंकर पाटील उरण यांची रायगड जिल्हा झोपडपट्टी जीर्ण चाळी संगोपन अध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे पत्र रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रायगड जिल्हा प्रभारी श्रीरंग बर्गे यांच्या उपस्थितीत देऊन त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
काँग्रेस पक्षाने रायगड जिल्हा झोपडपट्टी जीर्ण चाळी संगोपन अध्यक्षपदी निवड करुन माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती सार्थ करून झोपडपट्टी व जीर्ण चाळी अशा विविध प्रश्नी तसेच जनतेच्या समस्या सोडवण्यासाराठी सहकार्य करण्यात आपले मोलाचे योगदान राहिल.अशी भावना दिपक पाटील यांनी व्यक्त करुन जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या