कोर्लई,ता.२(राजीव नेवासेकर)पूरक व पर्यायी चिकित्सा पध्दतीने अनेक रुग्णांना दिलासा देणारे अक्युपंक्चर, योग-निसर्गोपचार तज्ञ्ज हिलर-विजय चंद्रकांत तांबडकर यांना अक्यु केअर इन्स्टीट्यूट (ACI) आणि होलिस्टिक हिलिंग ऑर्गनायझेशन (HHO) च्या वतीने *प्लाटिनम वेलनेस आयकाॅन अवार्ड - २०२४* जाहीर करण्यात आला असून ११ ऑगस्ट रोजी अहमदाबाद (गुजरात) येथे होणाऱ्या विशेष समारंभात तो त्यांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.
आधुनिक जीवन शैली जगत असताना अनेक तात्कालिक व जीर्ण रोगांचे प्रमाण वाढले असून त्यावर आधुनिक औषधांचा दुष्परिणाम पाहाता लोकांचा कल पारंपारिक, पुरक व पर्यायी चिकित्सा पद्धतीकडे वाढला आहे. अक्यु केअर इन्स्टीट्यूट (ACI) मुंबई आणि होलिस्टिक हिलिंग ऑर्गनायझेशन (HHO) दिल्ली या संघटना पर्यायी, पुरक व पारंपरिक उपचार पध्दतीचा प्रचार-प्रसार व विकासासाठी कार्यरत असून या क्षेत्रात अनेक वर्षे सेवा देणारे उपचारक तसेच त्यांची यशस्वी कारकिर्द तपासून सेवा जेष्ठतेनुसार त्यांना अनुक्रमे ब्राँझ, सिल्व्हर, गोल्ड, डायमंड, प्लाटिनम आणि लाईक टाईम अचीव्हमेंट अवार्ड देऊन सन्मान करणार आहेत. अक्युपंक्चर, योग-निसर्गोपचार तज्ञ विजय चं. तांबडकर यांना प्लाटिनम वेलनेस आयकाॅन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या