कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर)धुळे-पिंपळनेर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या १२ व्या राज्यस्तरीय तांग सू डो अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कराटेपट्टूंनी चमकदार कामगिरी करत १ सुवर्ण, ४ रजत आणि ८ कांस्यपदक पटकावले !
महाराष्ट्र तांग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन व धुळे जिल्हा तांग सू डो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या सहकार्याने १२ वी राज्यस्तरीय तांग सू डो अजिंक्यपद स्पर्धा नुकत्याच धुळे जिल्ह्यातील साई कृष्णा रिसोर्ट, पिंपळनेर येथे संपन्न झाल्या. यात राज्यातील एकूण २० जिल्ह्यातील कराटेपट्टूंनी सहभागी झाले होते.
तांग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ रायगड चे अध्यक्ष विजय चं. तांबडकर यांच्या नेतृत्वाखाली मुरुड व अलिबाग तालुक्यातील १८ खेळाडूंनी सहभागी झाले. रायगडच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत एक सुवर्ण, चार रजत आणि आठ कांस्यपदक पटकाविली.
मुरुड तालुक्यातील मजगांवच्या रेश्मा मंगेश भोईर हिने सुवर्ण पदक पटविले असून काव्या केतन नाक्ती (मजगांव),अमोघ समित दळवी (नांदगाव),अलिबाग येथील नम्रता गणेश चव्हाण व अन्यन्या वैभव निकम यांनी रजत पदक पटकावले.
तसेच अलिबागचे शिव देवजी हिलम, वेद वैभव कदम, निल गिरीश मगर, श्लोक अतुल जाधव आणि नांदगाव चे काव्या नाक्ती,आर्यन स्वप्निल गद्रे, जय गणेश ठाकूर (डबल ब्राॅंझ) कांस्यपदकाचे मानकरी ठरले आहेत.
सर्व खेळाडूंना मास्टर विजय तांबडकर व अभिषेक ग. तांबडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक प्रियांका संदेश गुंजाळ, वेदांत संदेश सुर्वे, सिध्देश सु. सतविडकर, आकांक्षा विजय तांबडकर यांनी प्रशिक्षण दिले.
खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी , शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून गावात सर्वत्र कौतुक केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या