कोर्लई,ता.३१(राजीव नेवासेकर)साळाव -मुरुड रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उनाड गुरांच्या त्रासा बरोबर विहूर ते मजगांव दरम्यान रस्त्यावरील उनाडणारी घोडे वाहनचालकांची डोकेदुखी ठरत असून वाहनचालकांना आपली वाहने चालवताना कसरत करावी लागते आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळ्यात या रस्त्यावर बोर्ली,बारशिव, काशिद, नांदगाव मजगांव विहूर मुरुड रस्त्यावर अनेक ठिकाणी उनाड गुरांचा ठिय्या असल्याचे चित्र दिसून येत असून त्यात भरीस भर आता या रस्त्यावर उनाड घोडे वाहनचालकांची अक्षरशः डोकेदुखी ठरत असून वेळप्रसंगी रात्री अपरात्री अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायत तसेच शासनाच्या संबंधित विभागाने यात लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या