मुख्याध्यापिका फैजा मुल्ला सेवानिवृत्त
कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर)पनवेल - बारापाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका फैजा अजिम मुल्ला ह्या आपली ३८ वर्षे ५ महिन्याची सेवा उत्तम प्रकारे करुन सेवानिवृत्त झाल्या.त्यांनी सुरुवातीला मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील उर्दू प्राथमिक शाळेतून २० ऑगस्ट १९८६ पासून सेवेत रुजू होऊन दहा वर्षे व नंतर वीस वर्षे मजगांव येथील उर्दू प्राथमिक शाळेत उत्तम प्रकारे सेवा केली.
माजी मुख्याध्यापक युसुफ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली माजी मुख्याध्यापक सैफुल्ला फिरफिरे मान्यवरांच्या उपस्थितीत बारापाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात मुख्याध्यापिका फैजा मुल्ला यांचा शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
फैजा मुल्ला यांनी आपल्या ३८ वर्षांच्या सेवेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साबीर दळवी, सदस्य,मोबिन दळवी तसेच माणगाव येथील उर्दू शिक्षक इब्राहिम जुले आदीं.नी आपल्या मनोगतात कौतुक केले तर माजी मुख्याध्यापक सैफुल्ला फिरफिरे यांनी मानपत्र व काव्य उपस्थितांसमोर सादर केले.
यावेळी बारापाडा एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, पनवेल -केळवणे रायगड जिल्हा परिषद शाळेचे केंद्र प्रमुख, शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या