कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर)महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालय, जिल्हा उद्योग केंद्र रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुड तालुका पंचायत समितीत पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ,कक्षअधिकारी वानखेडे,विस्तार अधिकारी संजय शेडगे, NRLM चे अनिल,प्रकल्प अधिकारी आनंद रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकचे शाखा अधिकारी गणेश पुगावकर, बॅंक ऑफ इंडियाचे गोंजी,सागर मेहतर, महाराष्ट्र बॅंकचे सुरेश मिश्रनी,सर्व बॅकाचे पदाधिकारी, पंचायत समिती माजी सभापती आशिका ठाकुर,शिवसेना जिल्हाप्रमुख तृप्ती पाटील, युवा प्रमुख दिनेश मिनमिने पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते.
सुरुवातीला उद्योग निरीक्षक मोहन पालकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येऊन पंतप्रधान रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या बाबतीत सखोल मार्गदर्शन केले. सुक्षितीत बेरोजगार यात कोणाला कसे , किती रुपये कर्ज, वयाची अट,सबसीडी, होणारे प्रशिक्षण, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, उद्योजक मासिक याची माहिती देऊन शंकांचे निरसन केले.मनोगतात मंदा ठाकूर यांनी आपण या योजनेचा लाभ घेतला असून प्रशिक्षणही केलेआहे.तरी जास्तीत महिला, पुरूषांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.ॲड. मृणाल खोत यांनी आजच्या कार्यशाळेमुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन करुन आर्थिक संकटाचे निवारण करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना आणल्या आहेत.हे निर्दशनास आणले.बॅक अधिकारी सागर मेहतर यांनी व्यवसायाला मुहूर्त बघायचा नसतो, व्यवसाय घरात ही करून उपजीविका करता येते.व बॅकेचे सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांनी आजच्या कार्यशाळेत प्रतिसाद चांगला असल्यामुळे सर्वांना धन्यवाद दिले.शेतक-यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सहकार्य तसेच माझ्याकडून काहीही सहकार्य लागल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या लतिका कवडे यांनी महिलांच्या प्रश्नांचे निरसन केले.जिल्हा उद्योग निरीक्षक मोहन पालकर यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या