कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर)मुरुडच्या दिवाणी न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायाधीश घन:श्याम तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांचे लैगिंक अत्याराचापासून संरक्षण कायदा (POSCO) तसेच मुलांचे अधिकार, बेटी बचाओ बेटी पढाओ याविषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सदर विषयांवर उपस्थित पक्षकार यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये ॲड.अजित चोगले यांनी मुलांचे लैगिंक अत्याराचापासून संरक्षण कायदा (POSCO) बाबत मार्गदर्शन केले. ॲड. डी.एन. पाटील यांनी मुलांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार याबाबत माहिती दिली.
अध्यक्ष मुरुड तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश घन:श्याम तिवारी (क. स्तर, मुरुड) यांनी मुलांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ बेटी पढाओ याविषयी सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन केले.
मुरुड वकील संघाचे अध्यक्ष ॲड.संजय जोशी, सचिव ॲड. डी.एन.पाटील,ॲड.अजित चोगले, ॲड. हुसेन, ॲड.एम.जी.तांबडकर तसेच सर्व सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या