कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर) शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत मुरुड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती व दरबार हॉल परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान हा महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांमधील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्वांवर (पंचमहाभूतांवर ) आधारित माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणारा पहिला कृतीशिल उपक्रम असून याचाच एक भाग म्हणून मुरुड तालुका पंचायत समितीतर्फे पंचायत समिती व दरबार हॉल परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी बाणवली प्रजातीची नारळ रोपे ,आवळा,करंज फळ -फुल झाडांची रोपे लावण्यात आली.
या वृक्षारोपण कार्यक्रमात तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय वानखेडे, शाखा अभियंता आशिष मुकणे, विस्तार अधिकारी प्रसाद माळी, सांख्यिकी विस्तार अधिकारी संजय शेडगे, कृषी अधिकारी राखी खोपकर, आरोग्य विस्तार अधिकारी राजेश वाडेकर, दत्तात्रय सातमकर,कवेश घरत, राजेंद्र चोरघे, राजेंद्र चुनेकर, जितेंद्र गावंड,प्रकाश मुंबईकर, श्रीमती वैशाली पेरावे, श्रीमती सुगंधा आडखळे, श्रीमती दिपिका पाटील, श्रीमती सपना राणे, श्रीमती शितल ठाकरे, श्रीमती रेखा बुल्लू, सुजित पवार,अनिष पाटील, चेतन मगर, सुशांत ठाकूर, ग्रामपंचायत ग्रामसेवक, कर्मचारी वृंद सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या