Type Here to Get Search Results !

मुरुडमध्ये आतापर्यंत ३६२ मि.मी.पावसाची नोंद : सकाळच्या विश्रांतीनंतर दुपारी बरसला !

कोर्लई,ता.२३ (राजीव नेवासेकर)गेले  चार दिवस मुरुड मध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

       आज गुरुवारी सकाळी ८-०० वा.पर्यंत ७८ मि.मी.तर आतापर्यंत ३६२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. २१ जून पासून मान्सूनच्या आगमनाने नागरिकांना दिलासा मिळाला तर शेतकरी राजा सुखावला. पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, तसेच पुणे, रायगड आणि रत्नागिरी येथील घाट क्षेत्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई. यांजकडून इशारा देण्यात आला तरी रात्री व सकाळी पडलेल्या पावसानंतर कडक उन तर दुपारच्या वेळी ढगाळ वातावरण होते.नंतर पावसाला सुरुवात झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर