Type Here to Get Search Results !

मुरुडच्या स्वयंसिद्ध हॉटेल नजीक रस्त्यावरील वादग्रस्त मोरीचे बांधकाम : बांधकाम उपअभियंता यांनी घेतली दखल

कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर)मुरुड मधील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रलंबित वादग्रस्त मोरीच्या कामामुळे शिवाजीनगर कोळीवाडा येथील शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आक्रमक झाले होते.याबाबतचे वृत्त वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजित सांगळे यांनी सदर वृत्ताची दखल घेत प्रत्यक्ष घटना स्थळी भेट देऊन पाहणी करून बांधकामात सुधारणा करण्यात आश्र्वासित केले.

     बांधण्यात येणाऱ्या या मोरीमध्ये संपूर्ण मुरुड शहरा मधून पाणी येत असल्याने त्यामध्ये प्रत्येक वाड्यां मधील घाण अडकून मोरीचे तोंड बंद होते,त्यामुळे मोरीजवळच असलेली भोसलेवाडी येथे आसपास रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते त्यातूनच सरपटणारे प्राणी घरामध्ये येण्याची दौश होण्याची दाट शक्यता असते त्यातूनच सर्वत्र दुर्गंधी पसरते आणि डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याचे तेथील कोळी महिलांचे म्हणणे पडते अखेरीस मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता अजित सांगळे यांनी मोरीच्या बांधकाम हा संदर्भात सुधारणा करून बांधकाम पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर