Type Here to Get Search Results !

सुपेगांव रस्त्यावरील झाडाच्या फांद्या वाहनचालकांची डोकेदुखी : झुडपे फांद्या हटविण्याची मागणी

कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर) मुरुड सुपेगाव रोहा रस्त्यावर सुपेगाव नजीकच्या रस्त्यावर झुकलेल्या वाकलेल्या झाडाच्या फांद्या वाहनचालकांची डोकेदुखी ठरत असून संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष असल्याबद्दल वाहनचालक व प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

   साधारणतः कोकणात भरपूर प्रमाणात पाऊस पडत असतो.गवत, झाडी झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढत असतात,रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी झुडपे हटविण्यासाठी बांधकाम खात्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

   फणसाड अभयारण्य व मुरुड-जंजिरा पर्यटनात रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर अन्य ठिकाणाहून काशिद-बिच, फणसाड अभयारण्य, मुरुड-जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी रोहा सुपेगांव मार्गे मुरुड रस्ता जवळ असल्याने या रस्त्यावर शनिवार रविवार व सुटीच्या दिवशी वाहनांची वाढती वर्दळ असते.

     यंदा पावसाळा नुकताच सुरु झाला असून या रस्त्यावर झाडाझुडपांचा विळखा असून काही ठिकाणी रस्त्यावर झाडे झुकलेल्या व तुटून फांद्या खाली आलेल्या अवस्थेत आहेत तर काही फांद्या अवजड वाहनांना लागून तुटून अक्षरशः लोंबकळताहेत.काही वळणात विशेष करून आदाड फाट्यापासून सुपेगांव ते तळेखार फाट्याकडे जाताना उतारावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

      शासनाच्या संबंधित बांधकाम खात्याने यात लक्ष पुरवून सुपेगांव रस्त्यालगत खाली आलेल्या झाडाच्या फांद्या हटविण्यात करण्यात योग्य ती उपाययोजना करतील काय? असा सवाल पर्यटक, प्रवासी, वाहनचालक व नागरिकांतून विचारला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर