Type Here to Get Search Results !

मुरुड आगाराला विविध समस्यांचा विळखा : नगरपरिषद शिवसेना गटनेते पांडुरंग आरेकर यांनी सहका-यांसमवेत भेट देऊन वाचला पाढा


 मुरुड,ता.३१(पांडुरंग आरेकर) मुरुड आगाराला अनेक महिन्यांपासून विविध समस्यांचा विळखा असून त्यामुळे शहरासह तालुक्यातील प्रवासी वर्गाला होणारा त्रास लक्षात घेऊन नगरपरिषद शिवसेना गटनेते पांडुरंग आरेकर यांनी आपल्या सहका-यांसमवेत आगार प्रमुख राहुल शिंदे यांची प्रत्यक्ष भेट देऊन समस्यांचा पाढाच वाचला !

  मुरुड आगारातून सुटणा-या लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेवर सुटत नाहीत, काही गाड्या अचानक रद्द करण्यात येतात,रस्त्यात गाड्या बंद पडण्याचे प्रकार यामुळे प्रवासी वर्ग त्रस्त असून हाल सहन करावा लागतो आहे.याच आगारातून नुकतीच सुरु करण्यात आलेल्या मुरुड -बोरिवली एस टी बसचे तिसऱ्या दिवशी कुरुळ नजीक डाव्या बाजूचे चाक निखळून घडलेला प्रकार आदी.विविध समस्यांचा पाढाच यावेळी वाचण्यात येऊन कारभार सुधारण्याची मागणी करण्यात आली.

 यावेळी नगरपरिषद शिवसेना गटनेते पांडुरंग आरेकर, उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत, विजय नाना पाटील, मनीष विरकुड, सभापती नगमाना खानजादे, ॲड.रुपेश पाटील नगरसेवक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर