कोर्लई,ता.31(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील उंडरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश वारगे यांचा सुपुत्र अवधूत वारगे याची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.
जिद्दीच्या बळावर स्वयंअध्ययनातून परीक्षेची तयारी करून अवधूतला यश मिळाले.अभ्यासाबरोबरच खेळ क्रीडा प्रकारात तो निपुण आहे.शालेय जीवनापासून पोलीस होण्याचे स्वप्न होते.मुरुडच्या द्रोणाचार्य ॲकडमी मध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेऊन वामन गोरे यांच्या उत्तम प्रकारे व योग्य मार्गदर्शनाने सातत्याने पराकाष्ठा करून त्याने आपल्या स्वप्नाची पूर्तता केली आहे.
मुंबई पोलीस दलात अवधूतची निवड झाल्याबद्दल मुरुड तालुका पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनीताई जंगम,नवगाव आगरी समाज अध्यक्ष प्रवीण बैकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच नवगाव आगरी समाज कमिटी,ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच तरूण मंडळ यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्याकडून शुभेच्छा वअभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या