Type Here to Get Search Results !

प्रामाणिक सेवेला सलाम! एसटी बस चालकाचा सेवेनिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न


मुरुड जंजिरा.दि.३१(बाबुराव गोळे)रायगड विभाग एसटी महामंडळाच्या अलिबाग आगारात गेली ३१ वर्षाची प्रामाणिकपणे सेवा बजावणारे बस चालक अशोक शिवाजी गोळे हे आज अधिकृतपणे सेवेनिवृत्त झाले. आपल्या शांत स्वभावाने, प्रवाशांशी नम्र वर्तनाने आणि वेळेचे काटेकोर पालन करून त्यांनी प्रवाशांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.

सेवेनिवृत्ती निमित्त डेपोमध्ये छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहकारी कर्मचारी, चालक, अधिकारी आणि अनेक प्रवाशांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

“सेवा हीच खरी पूजा” मानून त्यांनी ३१ वर्षे कोणतीही तक्रार न येऊ देता कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निवृत्तीमुळे डेपोमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर