कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर)शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हा ' श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' राबविण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांनी गुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीरात केले.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन तहसीलदार आदेश डफळ यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी नायब तहसीलदार राजेश्री साळवी, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी नंदकुमार आंबेतकर,पाणीपुरवठा सभापती पांडुरंग आरेकर, बालकल्याण समिती सभापती नगमाना खाननादे, बाधकाम सभापती यास्मिन कादिरी,विरोधी पक्षनेत्या अंकीता गुरव, नगरसेवक मनीष विरुकुड, विजय पाटील, श्रीकांत खोत, नितीन आंबुर्ले,निवडणूक नायब तहसीलदार कल्याण देऊळगावकर, भूमी अभिलेख अधिकारी विनोद काळे,विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अकृषिक तरतुदींचावत मार्गदर्शन, सनद प्रक्रिया, वर्ग-२ वगिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतर, तुकडेबंदी कायद्याच्या उपन प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे जाटप, ई-मोजणी अर्ज, ग्रीस्टैंक व पी.एम. किसान नांदगी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी गाव दप्तर अद्ययावत करणे तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाग याबाबत सविस्तर माहिती दिली, नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अशा शिबिरांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा.असे आवाहन तहसीलदार आदेश डफळ यांनी केले.
सदर शिबिरात विविध दाखल्यांचे यामध्ये उत्पन्नाचे ४८ दाखले,संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १८ मंजूरी प्रमाणपत्रे, ७/१२ चे २१७ दाखले, ८-अ चे १७२ दाखले, सात शिधापत्रिका तसेच पाच आधारकार्डाचे वितरण करण्यात आले तसेच निवडणूक विभागाचे विविध अर्ज,उत्पत्र दाखले, रहिवासी दाखले, जन्म-मृत्यू दाखले, नगरपरिषद असेसमेंट, संजय गांधी निराधार योजनेची नवीन प्रकरणे आणि शिधापत्रिकेसाठी अर्ज स्वीकारण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या