Type Here to Get Search Results !

राजपुरीच्या डॉ.ए.आर.उंड्रे हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के : रफान बंदरकर 93.40 टक्के गुण मिळवून मुरुड तालुक्यात प्रथम


कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून मुरुड तालुक्यातील रॉयल एज्युकेशन सोसायटीच्या राजपुरीच्या डॉ.ए.आर.उंड्रे हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेचा विद्यार्थी कुमार रफान बंदरकर हा 93.40 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

   यंदा दहावीच्या निकालात डॉ.ए.आर.उंड्रे हायस्कूलने उज्वल यशाची सुवर्ण परंपरा कायम राखत शंभर टक्के निकालाची अभिमानास्पद नोंद केली आहे.विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संपूर्ण मुरुड तालुक्यात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

   शाळेतील होतकरू ओळखल्या जाणाऱ्या कुमार रफान अहमद मुश्ताक बंदरकर याने 93.40 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या नावलौकिकात भर टाकली आहे.

  रॉयल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जमीर नझीरी, ट्रस्टी नगमा नझीरी,CEO मुबीन वरवंडे, प्रिन्सिपॉल रिझवाना हुर्जुक,सुपरवायझर दिनेश डोंगरीकर,निशा हेदुलकर,आफशॉ जमादार,सादिया राऊत, पत्रकार सरफराज दर्जी, मुश्ताक बंदरकर,तहसिन बंदरकर, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल व रफान बंदरकर याने दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कौतुक व अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर