Type Here to Get Search Results !

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी ठरतोय जिवघेणा ? बंदर अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष *लाईफ जॅकेटचा अभाव

कोर्लई,ता.६(राजीव नेवासेकर)मुरुड जंजिरा पर्यटनात जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेला रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी जिवघेणा झाला आहे. या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी जेट्टी उपलब्ध नसल्याने पर्यटकांची कसरत थांबणार कधी  ? असा सवाल पर्यटक व नागरिकांतून उठत आहे.

      या किल्ल्यात चढ उतार करताना पर्यटकांच्या अंगात लाईफ जॅकेट नसल्याने पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवेश करावा लागतो आहे. याकडे बंदर अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

        जंजिरा किल्ल्याच्या मागील बाजूस पच्छिमेला सुसज्ज शेट्टी उभारण्यात आली आहे. परंतु अजूनही ती पर्यटकांच्या वाहतूकीसाठी उपलब्ध केलेली नाही. त्यामुळे पर्यटकांना किल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून जिवघेणा प्रवेश करावा लागतो आहे. त्यात पर्यटकांना लाईफ जॅकेट नसल्याने हा प्रवास जिवघेणा झाला आहे. इतक होत असताना बंदर अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अजून किती काळ पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार असा सवाल होत आहे. 

       मध्यप्रदेश जबलपूर येथील नुकतीच घडलेली दुर्घटना व गेल्यावर्षी मुंबई येथील दुर्घटना यावेळी लाईफ जॅकेट चा अभाव त्यामुळे अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. पुन्हा तीच दुर्घटना घडण्याची प्रशासन वाटत पाहत आहे का? असा सवाल आम जनतेने केला आहे. लवकरात लवकर किल्याच्या मागील बाजूस पच्छिमेला असलेली ब्रेक वाॅटर बंधारा बांधून उभारण्यात आलेली जेट्टी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. व पर्यटकांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर