कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर) "मिशन विजय" अंतर्गत क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात आपला आगळावेगळा ठसा उमटविणारे मास्टर विजय चंद्रकांत तांबडकर यांना "एस.एम.इ.आंतरराष्ट्रीय पुरस्कार -२०२६" ने सन्मानित करण्यात आले.
स्पोर्ट्स मार्शल आर्ट व इंटरटेंमेंट या बहुद्देशीय संस्थेच्या वतीने ग्रॅन्ड मास्टर परवेज खान आणि संपादक जय गोहिल यांच्या हस्ते मुंबईत वाळकेश्र्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
१ मे या महाराष्ट्र दिनाचे निमित्ताने मुंबईत वाळकेश्र्वर येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात सांस्कृतिक,सामाजिक,क्रीडा,आरोग्य व शिक्षण अशा विविध क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा एस एम इ आंतरराष्ट्रीय पुरस्कार - २०२६ देऊन सत्कार करण्यात आला.
क्रीडा आणि आरोग्य असा दुहेरी संगम करून नवीन पिढीला याचं महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक वर्षे सेवा देणारे उपचारक व कराटेपट्टू मास्टर विजय चंद्रकांत तांबडकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संतनी लाइफ केअर फाऊंडेशनचे संचालक संतोष सुर्यवंशी व वेलनेस डे केअर सेंटर चे डॉ.मक्तदिर खान तसेच कराटे प्रेमी, चाहते,आप्तेष्ट,मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या