Type Here to Get Search Results !

मंडळ अधिकारी सुदर्शन सावंत यांच्यावर हल्ला करणा-या गाव गुंडांवर कठोर कारवाई करा : मुरुड तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन

कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर)अलिबाग तालुक्यातील आंदोशी येथे अवैध माती उत्खनन केलेल्या प्रकरणाची पाहाणी करण्यासाठी गेलेले महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सुदर्शन सावंत यांच्यावर भरदिवसा हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदाराचा कार्यकर्ता वरंडे गावचा माजी सरपंच सुधीर चेरकर याचा मुरुड तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून अशा गावगुंडावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी.याबाबत तहसीलदार आदेश डफळ यांना एक निवेदन देण्यात आले आहे.

    त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, अलिबाग तालुक्यातील चौल येथील मंड

ळ अधिकारी सुदर्शन सावंत हे अनधिकृत गौण खनिज वाहतुक रोखण्यासाठी शासकीय कर्तव्यावर असताना दि. २४/०५/२०२६ रोजी गाव गुंडांनी त्यांना जबर मारहाण केली आहे. या घटनेचा मुरुड तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेच्या वतीने प्रथम तिव्र निषेध करण्यात येत आहे. तसेच या भ्याड हल्यात जे जे दोषी आहेत त्यांच्यावर लवकर लवकर कठोर कार्यवाही व्हावी.असे तहसीलदार आदेश डफळ यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

   यावेळी मुरुड तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अनिल ढोले, उपाध्यक्ष राहुल जाधव, सचिव सानिका घरत, मंडळ अधिकारी मंगेश इग्रुळकर, संजय बिक्कड,ग्राम महसूल अधिकारी आरती म्हात्रे, वृषाली पाटील, संगीता भाटकर भावना धोदडे, रेश्मा विरकुड, मयूर नाईक, पूजा विरकुड,सोनल गुरव, प्रिय दुमते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर