Type Here to Get Search Results !

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या बंद झालेल्या शाखा पुनः स्थापित करण्यात येतील : संजय गुंजाळ



कोर्लई
,ता.२(राजीव नेवासेकर) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या बंद झालेल्या शाखाची नव्या उमेदीने व युवा पिढीच्या माध्यमातून मोठ्या अभिमानाने पुन्हा:स्थापित करण्यात येतील.असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी पोलादपूरच्या आकार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अ.वि. जंगम यांच्या "आपलं कोकण"  या पुस्तकाचे प्रकाशन व माजी शिक्षक सत्कार व             गुणगौरव सोहळ्यात केले.

    कोमसापच्या बंद झालेल्या शाखाची नव्या उमेदीने व युवा पिढीच्या माध्यमातून मोठ्या अभिमानाने पुन्हा:स्थापित करण्याची घोषणाही त्यांनी केली. या संकल्पनेवर कागदोपत्री शिक्कामोर्तब  होण्यासाठी पोलादपूर मधील साहित्यिकांनी एक निवेदन सुपुर्त केले.पोलादपूर कोमसाप शाखेची धुरा ही स्वराज्य रक्षक संभाजी फेम,लेखक, कवी, अभिनेते, दिग्दर्शक व शिवव्याख्याते असणारे मंगेश कंक यांच्या हातात देताना  समाधान वाटेल.असे गुंजाळ यांनी सांगितले.

पोलादपूर शाखेच्या निर्मिती बद्दल वेळोवेळी मधुभाईंनी इच्छा व्यक्त केली होती. आणि विशेष म्हणजे मधुभाई यांच्या वाढदिवसाला ही सुखद बातमी त्यांना दिली असल्याकारणाने या शाखेचा उद्घाटन सोहळा येत्या काही दिवसात कधीही झाला तरी भविष्यात वर्धापन दिन हा 28 एप्रिललाच साजरा केला जाईल. असे स्पष्ट केले. 

      रायगड भूषण कोमसाप केंद्रीय समिती विश्वस्त

एल बी पाटील साहेब,"इये देशीचे दुर्ग" पुस्तकाचे लेखक कोमसाप रायगड समन्वयक"सुखद राणे" व माजी जिल्हा समन्वयक अवि जंगम सर यांनी मंगेश कंक व त्यांच्या संपूर्ण समूहाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,कोमसाप  केंद्रीय अध्यक्ष नमिताताई कीर व कार्याध्यक्ष प्रा.डॉ.प्रदीपजी ढवळ,सदस्यांच्या उपस्थितीत लवकरच उद्घाटन सोहळा केला जाईल.असे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर