Type Here to Get Search Results !

मुरुडमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर संपन्न : नागरिकांनी घेतला विविध दाखले व योजनांचा लाभ


 कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर)शासन निर्णयानुसार मुरुड नगरपरिषदेच्या कै संतोष भाई तवसाळकर सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर उत्साहात संपन्न झाले.

   सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन शिवप्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करुन तहसीलदार आदेश डफळ व नगरपरिषदचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख काळे साहेब, मुरुड नगरपरिषद चे उपाध्यक्ष वीरेंद्र भगत,माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर व नगरसेवक रुपेश रणदिवे, प्रमिला सुभाष माळी, पांडुरंग आरेकर,यास्मिन कादीरी,नगमाना खानजादे, नितीन आंबुर्ले,अंकिता गुरव,प्रीता चौलकर, शिवसेना शहर अध्यक्ष दर्शन काळेबेरे मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. 

 नायब तहसीलदार कल्याण देऊळगावकर यांनी प्रास्ताविक केले तर शिबिरामध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा बाबतची सविस्तर माहिती तहसीलदार आदेश डफळ यांनी उपस्थिताना दिली तसेच सदर शिबिरामध्ये माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी शिबिराबाबत समाधान व्यक्त केले.

 प्रॉपर्टी कार्ड बाबत मुरुडचे उपअधीक्षक भूमी अभिलेख काळे साहेब यांनी माहिती दिली. सदर शिबिरामध्ये महसूल व नगरपरिषद विभागामार्फत विविध सेवा उत्पन्नाचे दाखले १७ ,मंजूर फेरफार १०, डिजिटल सातबारा ११४, ८ अ ६८ , दुय्यम रेशन कार्ड ९ , आधी दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच सदर शिबिरात SIR कार्यक्रमाच्या अनुषंगाने नगरपरिषद हद्दीतील सर्व BLO (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) यांनी उपस्थित राहून नागरिकांचे नमुना सहा ९, सात ६२, आठ ३७ चे फॉर्म भरून घेतले व प्रोजेनी मॅपिंग करण्यात आले.

सदर शिबिरात संगायो ०४, पुरवठा रेशन कार्ड ०९, आधार कार्ड ०७, मोजणी विभाग २०, सेतू सुविधा ३७, नगरपरिषद असेसमेंट उतारे ०४, रहिवाशी दाखले १३, जन्म दाखले ६०, मृत्य दाखले ५२ आदी अर्ज प्राप्त झाले व सदर शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली व विविध सेवांचा लाभ घेतला. सदर शिबिरास महसूल नायब तहसीलदार श्रीमती राजश्री साळवी मॅडम, मुरुड मंडळ अधिकारी तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी नगरपरिषद मुरुड सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर