Type Here to Get Search Results !

जंगल जेटीवरील लाईफ जॅकेटचा डेमो घेण्यात यावा : ज्ञानेश्वर फलेभाई



कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर)आगरदांडा ते दिघी जलवाहतूकीत आपत्ती काळात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या लाईफ जॅकेटचा डेमो घेण्यात यावा‌.अशी मागणी मुक्त पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर फलेभाई यांनी केली आहे.

 गेल्या अनेक वर्षांपासून आगरदांडा ते दिघी जलवाहतूकीत हजारों प्रवासी प्रवास करत असतात.या प्रवासा दरम्यान वादळ वारा आपत्ती काळात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरवल्या जाणाऱ्या लाईफ जॅकेट प्रत्येक प्रवाशासाठी आवश्यक आहे

यापूर्वी जबलपूर तसेच मुंबई येथे घडलेल्या दुर्घटनांमध्ये लाईफ जॅकेटच्या अभावामुळे पर्यटकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना ताज्या आहेत.

   अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरक्षेसाठी आगरदांडा ते दिघी जलवाहतूकीत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या लाईफ जॅकेटचा डेमो घेण्यात यावा.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर फलेभाई यांनी केली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर