कोर्लई,ता.18(राजीव नेवासेकर) राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळातर्फे रेवस -रेड्डी समृद्धी महामार्गाचे काम सुरु असून यात साळाव -मुरुड रस्ते विकासात खणलेले रस्ते-मो-यांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे.अशी मागणी वाहनचालक, प्रवासी वर्गातून जोर धरीत आहे.
साळाव -मुरुड रस्त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे मो-या व कॉंक्रिटिकरणाचे काम चांगल्याप्रकारे करण्यात येत असून या कामात दांडा, नांदगाव,मजगाव विहूर पेट्रोल पंप नजीकच्या रस्ता दोन महिन्यांपासून खणण्यात आलेला आहे, या रस्त्यावर आजही धुळीचा आणि ट्रॅफिक जॅम चा त्रास सहन करावा लागतो आहे.मे महिन्यात तिसरा आठवडा सरत नाही तो भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मान्सूनने यावर्षी वेळेआधीच प्रगती केली असून तो अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जूनच्या सुरुवातीला मान्सूनच्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने साळाव -मुरुड रस्त्यावर खणलेले रस्ते-मो-यांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे अशी मागणी वाहनचालक प्रवासी वर्गातून जोर धरीत आहे.
_____________________________________________

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या