कोर्लई,ता.७(राजीव नेवासेकर)शासन सेवेत कायम करा आणि आपल्या विविध मागण्यांसाठी समग्र शिक्षा अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दि.9 मार्च 2026पासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण व अन्न त्याग सुरू केला आहे,आज उपोषणाचा तीसावा दिवस आहे,कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्यात यावे या मागणीसाठी उपोषण करताना कोणत्याही प्रकारचा लेखी जीआर मिळालेला नाही म्हणून जोपर्यंत लेखी जीआर निघत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.एकूण 13 कॅडरचे असणारे संघर्ष समिती मधील कर्मचारी हे शासनाच्या सेवांपासून आजपर्यंत वंचित आहेत त्यांना शासन सेवेत समावेशन करून मुख्यमंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही वारंवार विनंती करण्यात येत आहे सर्व शिक्षा अभियाना मधील ज्याप्रमाणे 3000 कर्मचारी नियमित केले त्याचप्रमाणे उर्वरित 3779 कर्मचारी यांना देखील शासन सेवेत समायोजन करावे तसे आदेश प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात यावेत आणि समकक्ष वेतनश्रेणीवर समावेश करून सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा.यासाठी हे उपोषण सुरू आहे अनेक वार्ताहर,अनेक वाहिन्या आपल्या चॅनलवरून सदर उपोषणाची दखल घेत आहेत त्याचप्रमाणे शिक्षक संघटना केंद्रप्रमुख संघटना मुख्याध्यापक संघटना पदवीधर संघटना प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना देखील सर्वशिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी शिफारशी केलेले आहेत त्यांची या कार्यालयाला व विद्यार्थ्यांना शिक्षकांना अत्यंत आवश्यकता असल्याचे देखील लेखी दिलेले आहे. तरी या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करावे.अशी मागणी असून जो पर्यंत लेखी जीआर काढला जात नाही तोपर्यंत समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार केला व्यक्त केला आहे.
समग्र शिक्षा अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला महिना होऊनही अद्याप न्याय नाही
एप्रिल ०७, २०२६
0
Tags

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या