कोर्लई,ता.१०(राजीव नेवासेकर) शासनाच्या पोषण पखवाडा कार्यक्रमांतर्गत मुरुड तालुका पंचायत समितीत सभापती निलेश घाटवळ उपसभापती अश्विनी जंगम गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ मान्यवरांच्या हस्ते गरोदर,स्तनदा मातांना अतिरिक्त पौष्टिक आहार वाटप करण्यात आले.
राज्यात सर्वत्र गुरुवार दि.९ एप्रिल ते दि.२३ एप्रिल २०२६ या कालावधीत पोषण पखवाडा साजरा करण्यात येत असून मुरुड तालुका पंचायत समितीचे सभापती निलेश घाटवळ मान्यवरांच्या हस्ते पोषण पखवाडा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी गरोदर , स्तनदा ,माताना सभापती निलेश घाटवळ, उपसभापती अश्विनी जंगम, सदस्य, गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्या हस्ते लाभार्थींना अतिरिक्त पौष्टिक आहार चे वाटप करण्यात आले व आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले,तसेच पोषण पखवाडा बाबत मां आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आलेले परिपत्रक वाचन करण्यात आले.
यावेळी तालुका पंचायत समिती सभापती निलेश घाटवळ,उपसभापती अश्विनी जंगम, सदस्य अश्विनी डोंगरीकर, गणेश नाक्ती, गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय शेडगे, विस्तार अधिकारी प्रसाद माळी, वसंत दळवी, राजेश वाडेकर, स्वप्नील म्हात्रे, शुभांगी कोतवाल, सुवर्णा चांदोरकर, आशा सोनकुसरे, श्रुतिका भायदे, अंगणवाडी सेविका व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या