Type Here to Get Search Results !

लहानग्या आहाना सुभेदार हिने केले रमजान रोजे पुर्ण

कोर्लई,ता.५(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील ग्रामपंचायत सदस्या नजमा अझहर सुभेदार यांची लहानगी नात आहाना हिने पवित्र रमजान ईद चे ३० रोजे पुर्ण केल्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.आहाना सुबेदार ही माजी सरपंच व मुरुड शिवसेना तालुका प्रमुख नौशाद दळवी यांची पुतणी आहे.

    मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना नुकताच झाला असून या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे ठेवतात आयुष्यात प्रत्येकाने एकदा हे 30 रोजे ठेवायला हवेत असे कुराणात सांगितले आहे. लहान मोठ्यानं पासून सर्वच मुस्लिम बांधव रमजानचे रोजे ठेवतात. 

    बोर्ली येथील माजी ग्रामपंचायत सदस्या नजमा सुबेदार यांची 6 वर्षाची नात आहाना सुबेदार हिने हे 30 रोजे पूर्ण केले एवढ्या कमी वयात हे रोजे पूर्ण केल्याबद्दल परिसरात या लहान बाळाचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर