Type Here to Get Search Results !

मुरुडमध्ये रस्त्यावर झाडावर आलेली नारळे व झाप पादचारी वाहनचालकांची डोकेदुखी : उपाययोजना करण्याची मागणी

कोर्लई,ता.३०(राजीव नेवासेकर) एप्रिल महिना संपून-मे महिना असताना मुरुड जंजिरा पर्यटनात पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन शहरातील रस्त्यालगत,समुद्रकिनारी रस्त्यालगत,रस्त्यावर आलेल्या नारळ झाडांवरील झालेली नारळे व झाप पडण्याचा संभाव्य धोका ओळखून नारळ व झाप काढण्यात यावेत.याबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

         मुरुड समुद्रकिनाऱ्यावर सध्या पर्यटकांची वर्दळ हळूहळू सुरू होत आहे त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावरती फिरणाऱ्यांची संख्या जास्त असते.शहरातील काही रस्त्यालगत तसेच समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या बाजूस रस्त्यावर अनेक माडाची झाडे झुकलेली आहेत. रस्त्यावरुन जाताना सर्व माडाची झाडे बरोबर डोक्यावर नारळ झाडाचा पसारा घेवून आहेत. अनेक झाप व नारळ रस्त्यामध्ये पडतात. यामुळे वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

  मुरुड नगरपरिषदेने रस्त्यावर आलेले माड झाडांचे मालकांना नारळाचे झाडे साफ करून त्यावरील झाप, व नारळ काढून घेण्यासंबंधी सुचना देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर