
कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर) मुरूडमध्ये म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनतर्फे अलकापुरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात कोकण विभागीय नगर परिषद कामगार संघटना प्रतिनिधी चे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आराधना मंगेश दांडेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत तर या शिबिराच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष अँड सुरेश ठाकूर होते.
सदर शिबीरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि म्युनिसिपल युनियन (मुंबई) सरचिटणीस रमाकांत बने, उपाध्यक्ष रंगनाथ सातवसे,सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व उपनिबंधक सहकारी संस्था कोषाध्यक्ष गणेश देशमुख,अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नवी मुंबईचे विभागीय संचालक सिद्धार्थ चवरे, पनवेल महापालिका माजी सहायक आयुक्त सुनिल मानकामे, माजी नगरसचिव गणेश साळवे,म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन कार्याध्यक्ष संतोष पवार, मुंबई लेबर युनियन चिटणीस सुजित पाटील आदींनी अत्यंत सोप्या भाषेत परंतू प्रभावी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने उपस्थित कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या मनातील संभ्रम दूर करून घेतले आणि म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या वतीने हे प्रशिक्षण शिबीर घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अनिल जाधव यांनी केले तर सुत्रसंचालन राकेश पाटील आणि मनोज पुलेकर यांनी आभार मानले.
म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे विभागीय अध्यक्ष प्रकाश आरेकर यांनी उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश आरेकर,राजू पाटील,अभिजित चांदोरकर,राकेश पाटील,सतेज निमकर,दिपक शिंदे,निलेश शेंडगे,सुरेश माळी,स्मिता मुरूडकर,स्वप्रजा विरकुड,अभिजीत कारभारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या