कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील ४ ग्रामपंचायत करिता पोटनिवडणुक निवडणूक जाहीर झाल्या होत्या त्यापैकी वेळास्ते ग्रामपंचायत सर्वसाधारण स्त्री सदस्य पदाकरीता सेजल शैलेश काते व एकदरा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक २ अनु: जमाती सदानंद भिकु वाघरे हे बिनविरोध निवडून आले.तर ३ ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता काल शांततेत निवडणूक संपन्न झाला होत्या.
आज मुरूड तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार संजय तवर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वाजता उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी व पोलिस बंदोबस्त मतपेट्या ट्रेझरी तुन तहसीलदार दालनात आणण्यात आली.यावेळी नायब तहसीलदार संजय तवर यांनी मतमोजणीकरिता ३ टेबल लावण्यात आले होते. यावेळी मतदान अधिकारी यांनी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी समोर सील बंद मतपेट्या उघडण्यात आल्या.तद्नंर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.
प्रथम एकदरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतपेट्या उघडण्यात आल्या.
एकदरा ग्रामपंचायत पदाकरीता प्रभाग क्रमांक १ मधून अनु.जमाती सदस्य पदाकरीता ४६३ मतदाते यांनी मतदान केले होते.या मतमोजणीत
सदानंद भिकु वाघरे २५० मते,
धर्मा नांग्या लोदी २०९ मते,तर नोटा ४ मते मिळाली या मधुन सदानंद भिकु वाघरे हे प्रभाग क्रमांक १ मधून अनु.जमाती सदस्य पदाकरीता निवडुन आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद गणेश संन्याशी यांनी घोषित केले.
प्रभाग क्रमांक २ मधुन अनु जमाती स्त्री सदस्य पदाकरीता ५०३ मतदाते यांनी मतदान केले होते.
पुनम परशुराम गंबास ३३६ मते,
सहारा चिंतामणी लोदी १६२ मते,नोटा- ०५ मते पडली या मधुन अनु जमाती स्त्री सदस्य पदाकरीता पुनम परशुराम गंबास निवडुन आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद गणेश संन्याशी यांनी घोषित केले.
एकदरा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ अनु जमाती सदस्य पदाकरीता २६४ मतदाते यांनी मतदान केले होते.या मतमोजणीत
कैवल्य कमळाकांत लोदी ७८ मते
शेखर नारायण वाघरे १८१ मते,नोटा ५ मते पडली असुन या मध्ये प्रभाग क्रमांक ३ अनु जमाती सदस्य पदाकरीता शेखर नारायण वाघरे हे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद गणेश संन्याशी यांनी घोषित केले.
एकदरा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ अनु जमाती स्त्री पदाकरीता ५२८ मतदाते यांनी मतदान केले होते.या मतमोजणीत
करुणा धनंजय पाटील ८४ मते
पुनम परशुराम गंबास २०१ मते
सहारा चिंतामणी लोदी ८३ मते तर नोटा ८६ मते,व दुसऱ्या पेटीत नोटाला ७४ मते पडली असुन या मध्ये पुनम परशुराम गंबास हे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद गणेश संन्याशी यांनी घोषित केले.
मांडला ग्रामपंचायत पोटनिवडणुक २०२६ प्रभाग क्रमांक १ सदस्य पदाकरीता करिता ३१३ मतदाते यांनी मतदान केले होते.या मतमोजणीत
आकीब अनिस तांडेल यांना ८ मते ,
निसार अगनी दळवी ८९ मते,
राजेश एकनाथ पाटील १२३ मते
संतोष बाळकृष्ण देऊळकर ९२ मते तर नोटाला १ मते मिळाली असुन या मधुन मांडला ग्रामपंचायत सदस्य राजेश एकनाथ पाटील हे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हणमंत यादव यांनी जाहीर केले.
काशिद ग्रामपंचायत पोटनिवडणुक २०२६ प्रभाग क्रमांक ३ मधुन ना.मा.प. पदाकरीता ३८८ मतदाते यांनी मतदान केले होते.या मतमोजणीत
राकेश गणेश कासार २७४ मते,
सुयोग सुर्यकांत जंगम ११४ मते,
या निवडणुकीत काशिद ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता राकेश गणेश कासार हे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हणमंत यादव यांनी जाहीर केले.
काशिद ग्रामपंचायत पोटनिवडणुक २०२६ प्रभाग क्रमांक ३ मधुन सर्वसाधारण पदाकरीता ३८८ मतदाते यांनी मतदान केले होते.या मतमोजणीत
अतिश चंद्रकांत कासार २४५ मते,
हेमंत राजेंद्र चाळके १४३ मते मिळाली या मधुन काशिद ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता अतिशय चंद्रकांत कासार हे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हणमंत यादव यांनी जाहीर केले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे यांनी सांगितले की आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी मुरुड तालुक्या साठी करोड रुपयांची निधी व केलेला विकास हेच बघुन मतदाते यांनी शिंदे शिवसेना पक्षांच्या उमेदवारांना निवडून दिले. यापुढे प्रत्येक निवडणुकीत तालुक्यात शिंदे शिवसेना पक्षांचा झेंडा फडकेल.अशी प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या