या संदर्भात तक्रारी अर्ज आम जनतेच्या वतीने देण्यात आला आहे. मौजे टिटवी, (नागशेत) पारगाण, वाघिरपट्टी, ता. मुरुड येथे गावठी दारू हातभट्टी मोठ्या प्रमाणात चालू असताना आपल्या कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. व फणसवाडी (धनगरवाडी) येथील गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त करून पोलीसांचे जनतेतून कौतुक होत असताना वर नमुद असलेल्या गावांतील मोठ्या प्रमाणामध्ये चालू असलेल्या दारू हातभट्टीवर जाणूनबुजुन दुर्लक्ष होत आहे. सदर चालू असलेल्या दारू हात भट्टीमुळे तरुण मुले व महिला व्यसनाधिन होऊन गावातील लोकांना ते खूप त्रास देत आहेत. तसेच या गावठी दारूमुळे अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त होत आहेत, अनेक लोकांची संसार उद्ध्वस्त होऊन संसार उघड्यावर पडले आहेत.
सदर चालू असलेल्या टिटवी, (नागशेत) पारगाण, वाधिरपट्टी, या गावांमध्ये चालू असलेल्या दारू हातभट्टीवरून आपल्या कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याने या गावांमध्ये कारवाई कधी होईल? याकडे तेथील नागरिकांचा वरील गावांकडे लक्ष लागत आहे. त्यामुळे आपण या चालू असलेल्या दारू हातभट्टीवर पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहात. त्यामुळे या सर्व गावांचे खूप नुकसान होत आहे. टिटवी, (नागशेत) पारगाण, वाघिरपट्टी या गावांतील हातभट्टीवरून तेथे तयार होणारी दारू श्रीवर्धन, म्हसळा, रेवदंडा, अलिबाग, मजगाव, नांदगाव, खारीकवाडा, आदाड, उसरोली, मुरुड-भंडारवाडा, खोपोली, पाली, कर्जत, पेण, पनवेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा केला जातो.
तरी, या तक्रारीची दखल घेऊन आपण या गोष्टीकडे पूर्णतः लक्ष देऊन याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी.अशी नम्र विनंती सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या