कोर्लई,ता.२३(राजीव नेवासेकर) मुरुड जंजिरा पर्यटनात प्रसिद्ध असलेल्या फणसाड वन्यजीव अभयारण्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आणि ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांच्या संयुक्तविद्यमाने सुपेगाव येथील निसर्ग पर्यटन संकुलात जागतिक वसुंधरा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ग्रीन वर्क्स ट्रस्टचा १० वा वर्धापन दिनही साजरा करण्यात आला.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये निसर्ग संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवून ग्रीन वर्क्स ट्रस्टने गेल्या दहा वर्षांत केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला तर रुपाली नाईक यांनी प्लास्टिक प्रदूषण या विषयावर मार्गदर्शनपर सविस्तर माहिती देऊन उपस्थितांना पर्यावरण रक्षणासाठी जागरूक केले तसेच ग्रीन वर्क्स ट्रस्टच्या विविध उपक्रमांतून वापरल्या जाणाऱ्या किंवा त्यातून मिळणाऱ्या उपयुक्त वस्तूंची माहिती देण्यात आली. यामध्ये मधमाशी पालनातून मिळणारा मध, सापांना वाचवण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे इत्यादींचा समावेश होता.
यावेळी उपवनसंरक्षक शैलेंद्रकुमार जाधव,फणसाड वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे,ग्रीन वर्क्स ट्रस्टचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. निखिल भोपळे, कृपा पाटील, कोकबनच्या सरपंच तेजस्विनी वाजंत्री तसेच वनपाल, वनरक्षक, रा. जि. प. मराठी शाळा सातिर्डे-दरणे येथील शिक्षकवृंद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रीन वर्क्स ट्रस्टच्या विविध प्रकल्पांचे स्टेकहोल्डर्स आणि स्वयंसेवकांनी विशेष योगदान दिले.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या