Type Here to Get Search Results !

सुपेगाव–फणसाड रस्त्याची दुरुस्ती डांबरीकरण कधी करणार ? वाहनचालक व प्रवासी वर्गाचा सवाल

कोर्लई,ता१९(राजीव नेवासेकर) मुरुड -सुपेगाव –रोहा रस्त्यावर जवळचा मार्ग असलेला सुपेगाव-फणसाड दोन ते तीन किलोमीटर लांबीचा मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण कधी करणार ?असा सवाल वाहनचालक व प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.

      हा रस्ता खड्डेमय व अतिशय अरुंद असून विशेषतः सुपेगाव ते फणसाड प्रवेशद्वारापर्यंतचा अंदाजे ४ ते ५ किमीचा भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत.

   सध्या मुरुड – काशीद मार्गे रेवदंडा – अलिबाग या मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या मार्गाने प्रवास करण्यास मोठा वेळ लागत आहे. परिणामी, मुरुड परिसरातील सुमारे ९०% ते ९५% नागरिक, पर्यटक,रुग्णवाहिका तसेच मालवाहतूक करणारी वाहने वेळ वाचवण्यासाठी सुपेगाव – फणसाड मार्गाचा वापर करत आहेत.

परंतु सदर मार्ग अरुंद असल्यामुळे समोरून अवजड वाहने (एस.टी. बस किंवा ट्रक) आल्यास वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा वाहनांना जोखमीने मागे घ्यावे लागते. रस्त्याला साईड पट्टी नसून वळणेही अत्यंत धोकादायक आहेत. दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मते, अनेक वेळा वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याच्या घटना थोडक्यात टळल्या आहेत.

मुरुड – काशीद – रेवदंडा – अलिबाग रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी अजून किमान १ ते २ वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यातच पावसाळा जवळ येत असल्यामुळे या मार्गाची परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे.

   यासाठी सुपेगाव – फणसाड मार्गाचे शक्य तितक्या लवकर रुंदीकरण व दुरुस्ती करण्यात येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नाल्यांची व्यवस्था करण्यात यावी.अशी मागणी केली जात आहे.

 दरम्यान, आमच्या प्रतिनिधीने फणसाड वन्यजीव अभयारण्य विभाग व  सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क साधला असता, कानोसा घेतला असता ह्या मुळ रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात फणसाड वन्यजीव अभयारण्यने हिरवा कंदील दाखवला आहे, मात्र याकडे संबंधित बांधकाम खात्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.पावसाळ्यापुर्वी या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात यावे.अशी मागणी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर