Type Here to Get Search Results !

मुरुडमध्ये काळी जादू ? अंधश्रद्धेला उत, नागरिकांच्या चर्चेचा विषय


कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर) मुरुड मधील कल्याणी स्टॉप सबनीस आळी कडे जाणाऱ्या चौकात हायमास्ट दिव्याच्या खांबाखाली कोणा अज्ञात व्यक्तीने पपई वर काळी जादू केली असल्याचे दिसून आल्याने आजही अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे उघडकीस आले असून नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

   नुकतीच अमावस्या होऊन दोन दिवस होत नाहीत तो शहरातील एस टी बस स्टॉप पासून सबनीस आळी कडे जाणाऱ्या केणे पाखाडी नाका चिटणीस बंगल्यासमोर चौकात हायमास्ट दिव्याच्या खांबाखाली कोणा अज्ञाताने एका पपईवर टाचण्या टोचून गुलाल लावून उतारा टाकलेला आहे.त्यामुळे मुरुड मध्ये देखील आजही अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे बोलले जात असून नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर