Type Here to Get Search Results !

आदेश दांडेकर यांच्याहस्ते प्रज्ञाशोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार


 कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर)मुरुड नगरपरिषद शाळांमधील प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुरुड शहर प्रमुख तथा नगरपरिषदेचे नगरसेवक आदेश हरिश्चंद्र दांडेकर यांच्याहस्ते नगरपरिषद शाळांमधील प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी नगरपरिषदेचे नगरसेवक रुपेश रमेश पाटील,श्रद्धा चंद्रकांत अपराध,देवयानी देवेंद्र गुरव, उपशहर प्रमुख प्रशांत कासेकर,शकीब शाहबंदर,यश माळी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रज्ञाशोध परीक्षेत मुरुड तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कु.स्वरांजली जगताप (इयत्ता २ री, नगरपरिषद शाळा क्र. ५) हिने राज्यात ९३ वा क्रमांक मिळवून तालुक्यात प्रथम स्थान पटकावले,कुमार अर्णव टोकलवाड (इयत्ता ४ थी, नगरपरिषद शाळा क्र. २) याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.कु.वेदिका भोसले (इयत्ता ६ वी, नगरपरिषद शाळा क्र. ३) हिनेही तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.

यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तसेच यावेळी नगरपालिका शाळांमधील शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यात आल्या. भविष्यात नगरपालिका शाळा अधिक सक्षम, प्रबळ व दर्जेदार कशा होतील यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे आदेश दांडेकर यांनी सांगून शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर