Type Here to Get Search Results !

रखत्या उन्हात गो मातेला वाचविण्यासाठी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाचा भव्य जनआक्रोश मोर्चा ! तरुणींचा सहभाग., पोलिसांचा कडक बंदोबस्त

कोर्लई,ता.१५(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यात वाढत असलेली बेकायदेशीर गोहत्या आणि गोवंश तस्करी ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची आणि संतापजनक बाब आहे. आपल्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गोमातेचे रक्त आपल्याच मातीत सांडत आहे.गोहत्येच्या वाढत्या घटनांविरोधात आणि प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल मुरुड तालुक्याच्या वतीने शहरातील रखरखत्या उन्हात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात तरुणी मुलीचा सहभागी झाल्या होत्या. यावेळी या मोर्चाला मुरूड पोलिस ठाण्या मार्फत आर सी पी व दंगल नियंत्रण पथक व पोलिस पथक १५० पोलिसांसह ५ अधिकारी यांचा कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक -अभिजीत शिवथरे  पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक - राजेश रसेडे,पोलिस मकरंद पाटील,ट्राफीक पोलिस नाईक किशोर बठारे आदिंसह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी ११.३० च्या दरम्यान कल्याणी हाॅस्पीटल आझाद चौक येथुन या भव्य जनआक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली.यावेळी शेकाडो कार्यकर्त्यांनी हातात जय श्रीरामाचे व राजे शिवछत्रपती महाराजांचे झेंडे घेऊन तसेच "देश का बल बजरंग दल","जय श्रीराम", "भारतमाता की जय","धर्मा रक्षति रक्षित,गौ माता की जय", "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय","जन्म जन्म नाता है गाय  हमारी माता है" ,"ॐ नमो पार्वती पतये हर हर महादेव","हर हर महादेव, कसयांना थारा देण बंद करा- गो हत्या बंद"असे मजकुर लिहिलेले छोटे फलक घेऊन घोषणा देत आझाद चौक येथून नगरपरिषद कार्यालय, गणेश आळी नाका,मारुती नाका, दरबार रोड, तहसीलदार कार्यालया पर्यंत भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी विश्व हिंदू परिषद - बजरंग दल कार्यकर्तेनी मुरूड तहसीलदार आदेश डफळ यांच्या कडे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठीचे निवेदन सादर करण्यात आले. 

सदर निवेदनात

 अजामीनपात्र गुन्हा व शिक्षेत वाढ,सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करून गोवंश तस्करी आणि हत्येशी संबंधित गुन्ह्यांना अजामीनपात्र करण्यात यावे. तसेच, अशा गुन्ह्यांसाठी किमान १० वर्षांच्या सश्रम कारावासाची तरतूद करण्यात यावी., मालमत्ता जप्तीची तरतूद जे गुन्हेगार वारंवार गोवंश तस्करीमध्ये आढळतात, त्यांच्यावर 'मोक्का'  सारख्या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी आणि त्यांची अवैध मागनि कमावलेली मालमत्ता जप्त करण्यात यावी., वाहन जप्ती व परवाना रद्द करणे तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने कायमस्वरूपी जप्त करून, त्या चालकाचा व मालकाचा परवाना  आयुष्यभरासाठी रद्द करण्याची तरतूद कायद्यात समाविष्ट करावी., विशेष पोलीस पथकाची स्थापना रायगड जिल्ह्यासाठी आणि विशेषतः मुरुड सारख्या किनारपट्टीच्या भागासाठी एक विशेष 'गोवंश संरक्षण पोलीस पथक तैनात करावे, जे केवळ अशा गुन्ह्यांवर लक्ष ठेवेल., गोशाळांना शासकीय अनुदान केवळ कायदे कठोर करून चालणार नाही, तर जप्त केलेल्या गोवंशाचा सांभाळ करणाऱ्या गोशाळांना शासनाने तातडीने आणि पुरेसे आर्थिक अनुदान उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून गोवंशाचे रक्षण सुलभ होईल.

मुरुड तालुक्यातील हिंदू समाज हा शांतताप्रिय आहे, परंतु गोमातेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जर या कायद्यांमध्ये सुधारणा करून गुन्हेगारांना जरब बसवली नाही, तर संपूर्ण तालुक्यात तीव्र पडसाद उमटतील.तरी आपण या मागण्यांचा विचार करून मंत्रिमंडळात यावर ठोस निर्णय घ्यावा, ही विनंती.निवेदनात करण्यात आली.

   (विश्व हिंदू परिषद - बजरंग दल

प्रमुख मागण्या मुरूड मधील सर्व अवैध कत्तलखाने तात्काळ कायमस्वरूपी बंद करा.,गोवंश तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करा.,गोवंश हत्या बंदी कायद्याची मुरूड तालुक्यात कठोर अंमलबजावणी करा.संशयित भागात आणि चेकपोस्ट वर पोलिसांची कडक गस्त वाढवा.अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.)

________________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर