कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर) पुढील पाच वर्षांत सेवा निवृत्त शिक्षकांच्या निवृत्ती वेतन संदर्भातील समस्या निर्माण होणार नाहीत.यावर लक्ष देणार असल्याचे मुरुड तालुका सेवा निवृत्त शिक्षक संघटनेने पंचायत समितीत सदिच्छा भेट घेतली असता सभापती निलेश घाटवळ यांनी सांगितले.
मुरुड तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेतर्फे अध्यक्ष ल.ना.दांडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती निलेश घाटवळ, उपसभापती अश्विनी जंगम, गटविकास अधिकारी डॉ.राजेंद्रकुमार खताळ, गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांची सदिच्छा भेट घेतली असता पुढील पाच वर्षांत सेवा निवृत्त शिक्षकांच्या निवृत्ती वेतन संदर्भातील समस्या निर्माण होणार नाहीत.यावर लक्ष देणार असल्याचे निलेश घाटवळ यांनी सांगितले.
यावेळी सेवा निवृत्त शिक्षक संघटनेच्यावतीने सभापती निलेश घाटवळ यांचा अध्यक्ष ल.ना.दांडेकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्त शिक्षकांच्या संदर्भात निर्माण होणा-या समस्या १५ वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्त शिक्षकांबाबत, थकीत बिले इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. गजानन मुंबईकर,तांबे,जनाब,प्रमोद मसाल,अशोक दिवेकर,सुभाष पारवे,सुनिल बलकवडे,विलास कमाने, मिलिंद मयेकर, पांडुरंग निरकर,हासपाटीलबाई,
निरकरबाई,विनायक मेहेतर सेवा निवृत्त शिक्षक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या