Type Here to Get Search Results !

ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना अभियंता श्रद्धा बोऱ्हाडे एसीबीच्या जाळ्यात

कोर्लई,ता.१ (राजीव नेवासेकर) मुरूड येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोऱ्हाडे ठेकेदाराकडून अडिच लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) रायगड अलिबागने केलेल्या सापळ्यात ही भ्रष्ट अधिकारी ताब्यात घेतली आहे. २०२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागकडून मुरूड एकदरा-राजपुरी-खोकरी रोडवरील किमी ५/२७०च्या बाजूचे स्लॅब ड्रेन कामाचा टेंडर मिळवलेल्या ठेकेदाराने काम पूर्ण केले. परंतु, फायनल बिल इस्टीमेट तयार करण्यासाठी सा.बां. उपविभाग मुरूडच्या कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोऱ्हाडे यांनी तब्बल तीन लाखांची लाच मागितली. नाकारल्यावर तिने तडजोडीने अडीच लाखांवर शिक्कामोर्तब केले. 

       याबाबत दि. २८ मार्च रोजी ठेकेदाराने एसीबी रायगड-अलिबागकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता बोऱ्हाडे यांनी लाचेची मागणी आणि स्वीकृती मान्य केली. दि.३० मार्च रोजी मुरूड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात सापळा रचला असता, बोऱ्हाडे यांनी ठेकेदाराकडून पंचांसमोर अडीच लाख रुपये रोख स्वीकारताना रंगेहाथ पकडल्या गेल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील (एसीबी ठाणे), अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे (एसीबी ठाणे), पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले (जेसीबी रायगड) यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय निशांत धनवडे, पीआय नारायण सरोदे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर