Type Here to Get Search Results !

मुरूडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवीचा भव्य पालखी सोहळा; मंगळवारी रात्री जत्रा भरणार


कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर)मुरूड शहराची ग्रामदेवता असणाऱ्या श्री कोटेश्वरी देवीचा भव्य पालखी सोहळा वाजत गाजत सोमवारी शहरातून काढण्यात आला. या वर्षी या सोहळ्याचा मान गावदेवी राखाडीला देण्यात आला होता. मोठया संख्येने भक्त सोहळ्यात सहभागी झाले होते. तब्बल ५ तासांहून अधिक काळ हा सोहळा सुरू होता.

        कोटेश्वरी देवीच्या मंदिरातून पालखी सोहळ्याला सुरुवात होऊन  आदी विविध मार्गे पालखी मंदिरात आणण्यात आली.सोहळ्यात उपस्थित बांधव भगिनीं भगवे फेटे आणि पेहराव, एकाच रंगाच्या साड्या परिधान करून सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखी सोहळा काढण्याचे हे २३ वे वर्ष असल्याची माहिती कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री नयन कर्णिक यांनी दिली.बुधवारी मंदिर परिसरात रात्री यात्रा भरणार आहे.या भव्य पालखी सोहळ्याचे बकुळी नाका, गणेश सोसायटी, दत्तवाडी, जय शिवराय मंडळ, रणदिवे आळी, आदी अनेक ठिकाणी स्वागत आणि पूजन करण्यात आले.पालखी मार्गावर प्रसाद, खाद्यपदार्थ, थंड जलपान आदी व्यवस्था मंडळाचे वतीने ठेवण्यात आली होती. कोटेश्वरी देवस्थान ट्रस्ट रजिस्टर्ड असून सर्व पदाधिकारी समर्पित भावनेने देवीच्या चरणी सेवा करीत आहेत.मुरूड च्या वेशीवरच कोटेश्वरी देवीचे भव्य मंदिर असून राज्यातून देवीचे भक्त दर्शनासाठी येत असतात.जंजिरा संस्थान काळा पासून म्हणजे सुमारे 100 वर्षे अधिक येथे यात्रा भरते अशी माहिती जाणकार भक्तांनी सायंकाळी बोलताना दिली.

       यावर्षीचा पारंपारीक पालखीचा मार्ग कोटेश्वरी मंदिर, मारुती नाका, गणेश आली नाका, भोगेश्वर मंदिरमार्ग, सरळ गोलबंगला वेधून जुनीपेठ नाका, उजव्या बाजुने गावदेवी पाखाडी, सरख बापदेव मंदिरा जवळून उजव्या बाजुला भगत यांचे घरापर्यंत तेथून मागे बापदेव मंदिर, स्मशानभूमी रस्ता मार्गे कराडी समाज चाळांपर्यंत ते सुधाकर दांडेकर यांचे घरापर्यंत तेथून मागे सरळ काळभैरव कमानीसमोरुन प्रधान गल्लीमार्गे देवकुड चोकमार्ग सरळ लक्ष्मी-नारायण मंदिर, भोगेश्वर मंदिर मार्गे सरळ मारुती मंदिर मार्ग कोटेश्वरी मंदिर येथे सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर