कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर) मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयातील सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रवीण बागूल यांच्या विशेष प्रयत्नांतून मुंबईच्या इन्फिनिटी फिनकॉप सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे श्रीकांत रावळकर,एम.डी.व सी.ओ.यांनी सी.एस.आर फंडातून येथील ग्रामीण रुग्णालयाला विविध औषधे व साहित्य देण्यात आले आहे.
इन्फिनिटी फिनकॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड श्रीकांत रावळकर, एम डी व सी ओ यांनी त्यांच्या कंपनीच्या सीएसआर फंडातून ग्रामीण रुग्णालय मुरुड करिता चार लाख 31 हजार 671 रुपयाचे औषध साठा, प्रयोगशाळा साहित्य, एक्झामिनेशन टेबल, कमर्शियल वॉटर फिल्टर विथ कुलर असे साहित्य देणगी स्वरूपात दिले आहे.
ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होणार असून भविष्यात अशीच मदत मिळेल
अशी आशा वैद्यकीय अधीक्षक डॉ .उषा चोले यांनी व्यक्त केली असून वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी वृंद यांच्यावतीने इन्फिनिटी फिनकॉर्प सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या