कोर्लई,ता.25(राजीव नेवासेकर) रस्ते विकासात साळाव -मुरुड रस्त्याची कामे करण्यात होत असलेली घिसाडघाई तसेच परेशनाका ते एकदरा ब्रीज रस्त्याची दुरवस्था याबाबत मुरुड तालुका मुक्त पत्रकार संघातर्फे तहसीलदारांना एक निवेदन सादर करण्यात आले.यावेळी महसूल नायब तहसीलदार राजश्री साळवी यांनी निवेदन स्विकारले.
साळाव -मुरुड रस्त्यावर पावसाळ्यानंतर रस्ते विकास महामंडळातर्फे रस्ता रुंदीकरण व काँक्रिट करणाचे काम सुरु असून काम चांगल्या पध्दतीने होत असताना यारस्त्यावर कोर्लई,भोईघर फाटा, ताराबंदर, बाराशिव, काशिद सर्वे दोडा, नांदगाव,मजगांव, काशिद ,विहूर भागात काही ठिकाणी दोनही बाजूस रस्ते उखडल्याने व मोऱ्यांची कामे करण्यातही काही ठिकाणी खड्डे खणण्यात घिसाडघाई व बुजविण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत असून याचा दैनदिन अलिबाग -मुरुड प्रवास करणा-या वाहनचालक, कर्मचारी वृंद, प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागतो आहे.
नुकतेच सर्वे येथे रस्त्यावर मोरीसाठी खणलेल्या खड्यात मोटार सायकल कोसळून अलिबाग-तिनविरा येथे कार्यरत असलेल्या वनरक्षक सूरज सारंगे यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे तसेच मुरुड मधील पदेशनाका ते एकदरा बीज रस्त्यावर अनेक दिवसांपासून खड्यांचे साम्राज्य असल्याने या रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे . याबाबत सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी संबंधित बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली,मात्र अद्यापही या रस्त्यावर जैसे थे अशीच अवस्था असून अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष दिसून येते आहे.
रस्ते विकासात साळाव मुरुड रस्त्यावर वाहनचालक, प्रवासी वर्गाला होणारा त्रास लक्षात घेऊन आपणाकडून संबंधितांना योग्य ती उपाय-योजना करण्यात तसेच परेशनाका ते एकदरा ब्रीज रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी होण्या बाबत आदेश देण्यात यावेत.असे मुक्त पत्रकार संघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मुक्त पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष.राजीव नेवासेकर, उपाध्यक्ष अजित कासार,प्रदीप बागडे, सचिव नरेश वारगे, सहसचिव नैनिता कर्णिक, खजिनदार,पांडुरंग आरेकर,पत्रकार जाहिद फकजी,जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर फलेभाई उपस्थित होते.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या