Type Here to Get Search Results !

कोर्लई रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात टॅंकरचे पुढील चाक गेल्याने वाहतूक कोंडी

कोर्लई,ता.१५(राजीव नेवासेकर)राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळातर्फे रस्ता दुरुस्ती डांबरीकरण कामे करण्यात येत असून साळाव -मुरुड रस्त्यावर रस्ते रुंदीकरण व कॉंक्रीटिकरणात उखडून ठेवलेले रस्ते वाहनचालक व प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहेत.या रस्त्यावर कोर्लई स्टॉप नजीक रस्त्यालगत डाव्या बाजूला असलेल्या खड्ड्यात टॅंकरचे पुढील चाक गेल्याने गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते सात दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती.

 सायंकाळच्या वेळी अलिबाग व मुरुड कडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

   यावेळी शिवसेना बांधकाम कामगार सेना तालुका अध्यक्ष दिनेश मिणमिणे हे अलिबाग कडून मुरुड कडे त्याच वेळी जात होते,त्यावेळी रस्त्यावर त्यांनी टू व्हीलर चालकांना वाट मोकळी करून देण्यात मदत करत होते,स्थानिकांच्या सहकार्याने सुमारे अर्ध्या तासानंतर जेसीबीच्या साहाय्याने टॅंकर काढण्यात आल्यानंतर वाहतूक पुर्ववत झाली.

  खोदलेल्या खडी टाकलेल्या रस्त्यांमुळे नुकताच एक रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याचे समोर आले होते. त्यामुळे या मार्गावर पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी किंवा साळाव काशिद मुरुड हा एकेरी वाहतुक करावी व साळाव सुपेगाव मार्गे मुरुड अशी एकेरी वाहतूक करावी.अशी मागणी वाहन चालक व स्थानिकांकडून जोर धरत आहे. 

        रेवस- रेड्डी महामार्गाचे जोरदार काम सुरू झालेले आहे. या कामामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था न केल्याने वाहन चालकांना शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अतिदक्ष अशा रुग्णांना वाहतूक करताना रुग्णवाहिका या मार्गावर तासनतास विलंब होत आहे. त्यामुळे मुरुड ते अलिबाग जिल्हा रुग्णालयात रुग्णांना नेण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

        या मार्गावर होणाऱ्या वाहन चालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन साळाव काशीद मुरुड या मार्गाने एकेरी वाहतूक करावी व साळाव सुपेगाव या मुरुड या मार्गाचा एकेरी वाहतूकीसाठी वापर करण्यात यावा. एक तर साळावकडून काशीद मुरुडकडे जाणारी किंवा येणारी वाहतूक ठेवावी तसेच साळावकडून सुपेगाव मुरुड या मार्गावर जाणारी किंवा येणारी वाहतूक ठेवावी जेणेकरून साळाव काशीद मुरुड होणारी वाहतूक कोंडी रोखता येईल. अशी मागणी सर्व वाहन चालक स्थानिक ग्रामस्थ नागरिक यांच्यावतीने जोर धरीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर