कोर्लई,ता.१५(राजीव नेवासेकर) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा क्र. १ अंतर्गत मुरुड तालुक्यातील नांदगाव मंडळातील माळी समाज हॉलमध्ये महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तहसीलदार आदेश डफळ, नायब तहसीलदार संजय तवर, महसूल नायब तहसीलदार राजश्री साळवी, निवडणूक नायब तहसीलदार कल्याण देऊळगावकर, पुरवठा निरीक्षक गांगुर्डे,, पंचायत समिती सदस्य गणेश नाक्ती,सरपंच सेजल सुदेश घुमकर, उपसरपंच मेघा मापगावकर, सदस्य वैशाली रणदिवे, उदय थळे, जितेंद्र दिवेकर, विक्रांत कुबल,फैरोज घलटे, अस्लम हलडे, यशवंत पाटील, तहसील कार्यालयातील कर्मचारी,मंडळ अधिकारी मंगेश इग्रुळकर, नांदगाव महसूल मंडळातील सर्व तलाठी, कर्मचारी उपस्थित होते.
या अभियानाच्या अनुषंगाने गावोगावी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच शिबिरादरम्यान उपस्थित ग्रामस्थांकडून विविध शासकीय सेवांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले व अनेक सेवांचा तात्काळ लाभ नागरिकांना देण्यात आला.
सदर शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत विविध सेवा उत्पन्नाचे दाखले - ३८,वय व अधिवास प्रमाणपत्र - ७४,डिजिटल सातबारा - ३२७,डिजिटल ८-अ उतारा - १४७,रेशन कार्ड - २९,आधार कार्ड अपडेट - १२,नवीन आधार नोंदणी - ३,संजय गांधी निराधार योजना लाभार्थी नोंदणी- ४,निवडणूक विभागाच्या सेवा –
फॉर्म क्र. 6 (नवीन मतदार नोंदणी) ६८,फॉर्म क्र. 7 (नाव वगळणे) ५३,
फॉर्म क्र. 8 (दुरुस्ती / स्थलांतर) १३७,ऍग्रिस्टॅक नोंदणी - २,आभा कार्ड - ८,क प्रत वाटप - २,मोजणी नकाशा वाटप - ११,अर्ज दाखल करून घेणे,
जात प्रमाणपत्र - १८,उत्पन्नाचे दाखले - ३५,वय अधिवास दाखले- ५२
अशाप्रकारे या समाधान शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी तहसीलदार आदेश डफळ यांनी नागरिकांना आवाहन केले कि, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर अभियान अंतर्गत पुढील शिबिर दि.१० एप्रिल २०२६ रोजी वळके येथील हनुमान मंदिरात तर दि.१७ एप्रिल २०२६ रोजी उसरोली टेप येथे पंचक्रोशी आगरी समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन महसूल विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा लाभ घ्यावा. असे आवाहन तहसीलदार आदेश डफळ यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार उदय खोत यांनी केले तर मंगेश इग्रुळकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या