Type Here to Get Search Results !

मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात'एचपीव्ही' लसीकरण


कोर्लई,ता.१३(राजीव नेवासेकर) गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी राज्यात एचपीव्ही लसीकरण मोहीम राबवली जात असून गर्भाशय मुखाच्या कर्करोगा विरुद्ध लढा देण्यासाठी मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा शुभारंभ झाला आहे.

  या मोहिमेअंतर्गत ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केलेली आहेत, मात्र १५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत.अशा सर्व मुलींना ही लस ग्रामीण रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा चोले यांनी दिली.

     महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेता, या गंभीर आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे.हा आजार टाळता येण्यासारखा आहे आणि वेळेवर दिलेली लस मुलींच्या भविष्यातील आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.एचपीव्ही' लस हा नवीन नसून जगभरात ५० कोटींहून अधिक महिलांनी ती घेतली आहे. ही लस ९३ ते १०० टक्केपर्यंत प्रभावी आहे. पालकांनी आपल्या मुलींचे नाव 'यू वीन' पोर्टलवर नोंदवून जवळच्या आरोग्य केंद्रात लसीकरण करून घ्यावे. काही पालकांमध्ये लसीच्या दुष्परिणामांबाबत गैरसमज असू शकतात. मात्र, इतर लसींप्रमाणेच केवळ इंजेक्शनच्या जागी थोडे दुखणे किंवा हलका ताप येऊ शकतो, जो २-३ दिवसांत बरा होतो. या लसीमुळे भविष्यात प्रजनन क्षमतेवर कोणताही विपरित परिणाम होत नाही, उलट ती भविष्यातील आरोग्याचे रक्षण करते.गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आजार आहे. नियमित तपासणी आणि वेळीच लसीकरण केल्यास या आजाराचा आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूचा धोका आपण लक्षणीयरित्या कमी करू शकतो.

         -- डॉ.उषा  वैद्यकीय अधीक्षक  ग्रामीण रुग्णालय, मुरुड-जंजिरा, रायगड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर