कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर)शासन सेवेत कायम करा आणि आपल्या विविध मागण्यांसाठी समग्र शिक्षा अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दि.9 मार्च 2026पासून आझाद मैदान येथे अमरण उपोषण व अन्न त्याग सुरू केला आहे
आज उपोषणाचा चौथा दिवस आहे,शासन सेवेत कायम करावे.यासाठी पुनश्च एकदा उपोषण करण्याची वेळ समग्र शिक्षण अभियानातील कर्मचारी वृंदांना आलेली आहे. शासनाने वेळोवेळी तोंडी आश्वासने देऊन कोणतीही लेखी पूर्तता न केल्याने पुनश्च आमरण उपोषण करण्यात येत आहे चौथ्या दिवशी अन्नत्या केल्यानंतर दोन-तीन व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ आली आहे जर असेच आंदोलन सुरू राहिले तर उद्यापर्यंत जवळजवळ 15 ते 20 कर्मचारी सिरीयस होतील.अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे शासनाने उपोषणाची दखल घेऊन लवकरात लवकर कायम करण्यासंबंधीचा जीआर निर्गमित करावा असे आवाहन सदर आंदोलनकर्त्यांनी शासनास देण्यात येत असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा राज्याचे सल्लागार विश्वनाथ म्हात्रे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या