कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर)राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यां च्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा क्र. 1 अंतर्गत मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील माळी समाज हॉल येथे दि.१४ मार्च रोजी आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन तहसीलदार आदेश डफळ यांनी केले आहे
या शिबीरात मिळणाऱ्या महसुली सेवांमध्ये प्रलंबित फेरफार,अकृषिक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा,तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाच्या प्रकरणांचा निपटारा,७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज,डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उता-यांचे वाटप,
सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे साम मंजूर करणे, ॲग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी,उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र,विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप,भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत केली जाणार असून नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र,वर्ग २ जमिनीचे वर्ग १ मध्ये रुपांतर आदी.सुविधांचा लाभ मिळणार आहे.
नांदगाव पंचक्रोशीतील सर्वांनी या या शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन तहसीलदार आदेश डफळ यांनी केले आहे.
सदर शिबिराच्या अनुषंगाने ग्रामपंचायत नांदगाव, मजगाव,उसरोली,काशीद,वेळास्ते व विहूर येथे निवडणूक नायब तहसीलदार कल्याण देऊळगावकर व उपाधीक्षक भूमीअभिलेख काळे साहेब ,मंडळ अधिकारी मंगेश इग्रुळकर ग्राम महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी मयूर नाईक व अनिल ढोले यांनी शिबिराची पूर्वतयारी म्हणून जनजागृती करण्यात येऊन ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थित राहून विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या