गेले कित्येक वर्षे हा सुपेगाव मार्गावर रस्ता न बनविल्याने अद्याप खड्ड्यातच आहे.मुरुड-जंजिरा पर्यटनात रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर अन्य ठिकाणाहून काशिद-बिच, फणसाड अभयारण्य, मुरुड-जंजिरा किल्ला पाहाण्यासाठी रोहा सुपेगांव मार्गे मुरुड रस्ता जवळचा असल्याने या रस्त्यावर वाहनांची वाढती वर्दळ असते, या पंचक्रोशीतील अनेकांना . आपल्या रोजीरोटीसाठी टू व्हीलर वरून दररोज प्रवास करावा लागतो.गेले कित्येक वर्षापासून या रस्त्यावर ब-याच ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य असून वाहन चालकांना आपली वाहने चालवताना कसरत करावी लागते आहे. खड्यांच्या साम्राज्यामुळे या रस्त्यावर वेळप्रसंगी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने यात लक्ष पुरवून सुपेगांव मार्गावर रस्त्यावर दुरुस्ती डांबरीकरण न झाल्यास नाईलाजास्तव पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.असा इशारा युवासेनेचे तालुका चिटणीस अविनाश शिंदे यांनी दिला असून याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील.असे म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या